असमतोल पर्यावरण आणि आपण

Posted by

पर्यावरणाचा  असमतोल  दिवसे दिवस वाढत आहे. निसर्ग संपत्तीचा वारेमाप आणि सारासार विचार न करता आपल्या फायद्यासाठी वापर करून, आपणच आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. म्हणूनच  वाघ वाचवा ,चिमण्या वाचवा,प्लास्टीकचा वापर टाळा इ.  मोहिमा आखाव्या लागतात हि लाजिरवाणी गोष्ट आहे.

आपण बेडकाचे उदाहरण घेऊया. सापाचे  खाद्य बेडूक , बेडकाचे खाद्य मच्छर , माश्या . भराव  टाकून वस्ती वाढवली  जात असताना  बेडूकशहरातून हळुहळु नामशेष झाले.  वारेमाप कॉक्रिटिकरण, नको तेथे पेवरब्लॉग  टाकणे, असलेली तळी  बुजवत जाणे इ.  बरीच कारणे ह्याला कारणीभूत आहेत.  बेडूक नाही म्हणून साप कमी झाले,  मच्छर वाढत गेले. डेंग्यु , मलेरिया ह्या रोगांचा सुळसुळाट वाढला तरी आपल्याला जाग येत नाही.

या उलट , प्राणीमात्रांवर दया करणारा एक वर्ग एक वेगळीच समस्या निर्माण  करत आहेत .   कबुतरांना धान्य टाकून ते कुठचे  पुण्य  मिळवतात  नकळे!  आयते खाद्य देऊन  कबुतरांना  गुलाम करण्याचा त्यांना काय अधिकार  आहे?  तसेच कबुतरांच्या विष्ठेमुळे  निर्माण  होणाऱ्या  आजारांच्या नविन समस्यानां  आपण कसे  सामोरे  जाणार आहोत? प्राणीमात्रांच्यां एकमेकांवर  अवलंबून असण्याच्या निसर्गचक्राचा  नियम मोडल्यामुळे कावळे , चिमण्या हे हि  नामशेष  होत आहेत. आता आपल्याला निसर्गाच्या नियमांचे पुनश्च शिक्षण घेऊन स्वत:च  स्वताला शिस्त लावण्याची  गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *