माझ्याबद्दल

लहानपणी घरातील भिंतींवर रेघोट्या ओढण्याचा नाद होता. आमच्या शेजारचे मामा खुप कौतुक करत, पण ते चित्रकलेचे शिक्षक असल्यामुळे त्यांना त्या रेघोट्यामध्ये चित्र दिसतात असा सर्वांचा समज होता. मला कलाक्षेत्रात जावु द्यावे असा त्याचा आग्रह होता. पण नशीबात काही वेगळे होते, सगळे ठोकताळे चुकले. Debit what comes in – Credit what goes out ह्या सुत्राशी बांधली गेले. नको असलेल credit होत गेले आणि हवे असलेले debit करावे लागले.

स्वत:च रंगाचे फराटे ओढत शिकत गेले. कला गुरुशिवाय अपुर्ण असते आणि सगळेच काहि एकलव्य नसतात. म्हणुनच हातात कला असली तरी, नजर चित्रकाराची नाही होऊ शकली. जेव्हा निसर्गाला सामोरी जाते तेव्हा नुसतेच रंग दिसतात, त्याचे composition नाही  होत.

चित्रकलेचे शास्त्रोक्त ज्ञान नसल्यामुळे , एखादे चित्र किंवा छायाचित्र दिसले कि त्याची नक्कल करण्याचा मोह होतो. नक्कल करणारे ते नकलाकार – ’न’कलाकार शब्द बोचतो. असे म्हणते की हुबेहुब चित्र काढण्याचा छंद आहे. अर्थात छंदाचे हे digitalization स्व:तासाठी करते आहे. प्रयत्न करत करत चित्र जमत गेली तसेच प्रयत्न करता करता कदाचित चित्रकलेची नजर हि मिळेल! एक तरी स्व:ताची कलाकृति बनवायची अशी एक अधुरी मनिषा  मनात आहे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *